मुंबई: ड्रग्ज प्रकरणात बनावट कारवायांचे आरोप झाल्यामुळं वादात अडकलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना पुढं येऊ लागल्या आहेत. '' या संघटनेनं आज एनसीबीच्या कार्यासमोर समीर वानखेडे यांचा जाहीर सत्कार केला. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली. () कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणातील कारवाईनंतर समीर वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी ही कारवाई बोगस असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी काही पुरावे देखील दिले होते. समीर वानखेडे हे खंडणी वसुलीसाठी निष्पाप लोकांना ड्रग्ज प्रकरणात अडकवतात. भाजपच्या काही लोकांची त्यांना साथ आहे, असा दावाही मलिक यांनी केला होता. मात्र, नवाब मलिक हे त्यांचे जावई समीर खान व आर्यन खान यांच्यावर कारवाई झाल्यामुळं असले आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलं होतं. काही नेत्यांनी नवाब यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना या संपूर्ण प्रकरणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धार्मिक पार्श्वभूमीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं आणखी खळबळ उडाली होती. वाचा: आता काही हिंदुत्ववादी संघटनांनी समीर वानखेडे यांची पाठराखण सुरू केली आहे. 'शिवप्रतिष्ठान' नावाच्या संघटनेनं आज थेट कार्यालयासमोर धडक देत समीर वानखेडे यांचा सत्कार केला. वानखेडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वानखेडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं 'शिवप्रतिष्ठान'चे यांनी सांगितलं. नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांना आमचा विरोध आहे. त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करत राहू, असंही चौगुले यांनी सांगितलं. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BCO5Op