Type Here to Get Search Results !

नगर जिल्हा रुग्णालय आग: 'त्या' पत्राचा दाखला देत शिवसेनेचा गंभीर आरोप

अहमदनगर: नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील आगीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यात शिवसनेनेही उडी घेतली असली तरी त्यांनी राजकीय आरोप न करता जिल्हा शल्यचिकित्सक यांचा निष्काळजीपणा आणि हेकेखोर वृत्तीमुळे आग लागल्याचा आरोप केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी पोखरणा यांना दिलेल्या पत्राचा शिवसनेने दाखला दिला आहे. () ‘ज्या अतिदक्षता विभागात आग लागली, तेथील सदोष वीज जोडण्यांकडे लक्ष वेधत दुरुस्ती करण्यासंबंधी बांधकाम विभागाचे वीज तांत्रिक अभियंता जगदीश काळे यांनी डॉ. पोखरणा यांना दोन महिन्यांपूर्वीच पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असती तर ही दुर्घटना टळली असती,’ असा दावा शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे. वाचा: जाधव यांनी सांगितले की, ‘ही घटना घडल्यानंतर मी, संजय वल्लाकट्टी आणि मंदार मुळे यांनी लगेच नगरच्या सार्वजनिक विभागाचे वीज तांत्रिक अभियंता जगदीश काळे यांच्याशी संपर्क साधला. या घटनेस आपणच जबाबदार असल्याचा जाब त्यांना विचारला. तेव्हा काळे यांनी आम्हाला हे पत्र दाखविले. ते पत्र काळे यांनी डॉ. पोखरणा यांना लिहिलेले आहे. त्यात म्हटले आहे की, सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील वायरिंग सदोष आहे. तेथील एसी २४ तास सुरू असतात. एसीचे पाईप आणि सोबत ऑक्सिजनचेही पाइप गेलेले आहेत. या पाइपवर कमी तापमानामुळे बर्फ साठतो. नंतर तो वितळून त्याचे पाणी विजेच्या वायरिंगवर पडते. त्यामुळे तेथे शॉर्ट सर्किट होण्याचा मोठा धोका आहे. असे शॉर्ट सर्किट होऊन वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकारही तेथे सुरू होते. ही तांत्रिक चूक दुरुस्त करावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, असे पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. ६ सप्टेंबर २०२१ रोजी हे पत्र काळे यांनी जिल्हा रुग्णालयाला पाठविलेले आहे. मात्र, हेकेखोरपणा करणारे डॉ. पोखरणा यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, असा आरोप जाधव यांनी केला आहे. या दुर्घटनेला डॉ. पोखरणा हेच जबाबदार असल्याचा आरोप करून जाधव यांनी म्हटले आहे, या पूर्वीच्या काळात डॉ. पोखरणा यांनी असेच बरेच पराक्रम केल्याचे कर्मचारी सांगतात. करोना काळात त्यांनी मनमानी कारभार केला. कर्मचारी आणि रुग्णांना तसेच नातेवाईकांना मानसिक त्रास दिल्याचे अनेक किस्से सांगितले जातात,’ असेही जाधव यांनी म्हटले आहे. वाचा: शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले की, ‘आग लागलेला अतिदक्षता विभाग जेथे आहे, त्याचे बांधकाम अपूर्ण होते. महापालिकेने त्याला पूर्णत्वाचा दाखला दिलेला नव्हता. तरीही तेथे अतिदक्षता विभागासारखा महत्वाचा विभाग सुरू करण्यात आला. डॉ. पोखरणा यांच्या मनमानीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे,’ असा आरोप बोराटे यांनी केला आहे. तर ‘वर्षानुवर्षे नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठाण मांडून बसलेले सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल कारवा,’ अशी मागणी शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CRK8qI

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.