Type Here to Get Search Results !

जळगावः भुसावळ आगारातून सुटलेल्या पहिल्या बसवर दगडफेक

जळगावः जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आगारातून सुटलेली भुसावळ ते बोदवड या पहिल्या बसवर दिपनगर जवळ अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी घडली आहे. शुक्रवारीही यावल येथेही बसवर दगडफेक करण्यात आली होती. जिल्ह्यात बसवर दगडफेक झाल्याची आजची दुसरी घटना आहे. () राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्यापही तोडगा निघालेला आहे. राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केली आहे. पगारवाढीच्या घोषणेनंतरही काही आगारात एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, भुसावळ आगारातून गेल्या २० दिवसापासून बस सेवा बंद होती. मात्र, अनिल परब यांनी आज अखेरचा अल्टीमेटम दिल्याने भुसावळ आगारातील सहा संपकरी एसटी कर्मचारी कामावर हजर झाले. यावेळी भुसावळ आगारातून जळगाव यावल बोदवड मार्गावर बस सोडण्यात आल्या होत्या. यावेळी भुसावळ आगारातून बोदवडकडे निघालेल्या बसवर दिपनगर नजीक अज्ञातांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या आहेत. वाचाः भुसावळ आगारातून बोदवडकडे निघालेल्या धावत्या बसवर रस्त्यात दिपनगरनजीक अज्ञातांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या. या बसमध्ये आठ प्रवासी होते. दगडफेकीत कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनेनंतर याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर बस जागेवरच थांबवण्यात आली आहे, असे या वेळी बस वाहकाने सांगितले. वाचाः दरम्यान, शुक्रवारी यावल येथेही बसवर दगडफेक झाली होती त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही आज दीपनगरजवळ बसवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे या घटना लक्षात घेता आता जळगाव जिल्ह्यात एसटी कामगारांचा सुरू असलेला संप चिघळण्याची लक्षणे आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3le7Y9c

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.