Type Here to Get Search Results !

त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात का?; संजय राऊतांनी व्यक्त 'ही' शंका

मुंबईः त्रिपुरातील हिंसाचाराविरोधात अमरावतीत शुक्रवारी निघालेल्या निषेध मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील तीन शहरांत हिंसाचार घडला. या घटनेमुळं राजकारणही तापलं आहे. भाजपनं आक्रमक भूमिका घेत आज अमरावती बंदची हाक दिली आहे. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतचे खासदार (Sanjay Raut) यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही उमटले, असा सवाल केला आहे. 'रझा अकादमी काय म्हणते मला माहीत नाही. पण महाराष्ट्रात हिंसाचार किंवा दंगली घडवण्या इतकी ताकद किंवा समर्थन रझा अकादमीकडे कधीच नव्हतं. काही वेळेला रझा अकादमीने लोकांची डोकी भडकवली आहे. पण त्यांच्यावर सरकारने पूर्ण नियंत्रण आणलं आहे. खरंतर त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद का उमटावे? त्रिपुरात असं काय घडलं की त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटावी? बांगलादेशमध्ये मंदिरामध्ये हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले. त्यात मशिदींवर दगडफेक झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं सांगतात. मग महाराष्ट्रातच का? उत्तर प्रदेशात का नाही? दिल्लीत का नाही? बिहारमध्ये का नाही? कर्नाटकात का नाही? फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काही तरी कारस्थान आहे असं वाटतं, अशी शंका संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. वाचाः 'बांगलादेशातील मंदिरावरील हल्ले ही चिंतेची गोष्ट आहे. मग कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंचं शिरकाण होतंय, त्याविरोधात का मोर्चे काढले जात नाही? त्रिपुरा सोडा, इतरत्रं का काढत नाहीत मोर्चे? काल मणिपूरमध्ये एक कर्नल आणि एक कुटुंब मारलं गेलं ही त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट आहे. त्यावर दिल्लीत मोर्चा काढला पाहिजे, मी तर असे म्हणेन काश्मीरमध्ये पंडिताच्या व जवानांच्या हत्या सुरु आहेत. त्यासाठी समस्त हिंदुत्वावादी व राष्ट्रवादी पक्षानं एकत्र येऊन दिल्लीत मोर्चात काढला पाहिजे,' अशी टीकाही त्यांनी केली आहे. वाचाः 'त्रिपुरात मोर्चा काढतात. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि रझा अकादमी म्हणते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करत आहे? त्याचे उत्तर मिळायला हवं. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं म्हणणं आहे की, त्रिपुरात काही घडलंच नाही. त्रिपुरात काही घडलंच नाही तरी मोर्चे निघत आहेत. त्रिपुरात काहीच घडलं नाही हे जर सत्य असेल तर मोर्चा आणि आंदोलनाचे आम्ही जे फोटो पाहतोय ते काय आहे? कशा करीता हा सर्व खेळ सुरू आहे? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात तणाव निर्माण करण्याचा हा डाव आहे काय? तसेच त्रिपुरात भाजपला तृणमूल काँग्रेसचं आव्हान उभं राहत आहे. त्यामुळे तर हे षडयंत्रं रचलं जात नाही ना?,' असाही सवाल त्यांनी केला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qzA02o

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.