Type Here to Get Search Results !

नवाब मलिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; चंद्रकांत पाटलांनी दिला सूचक इशारा

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) आरोप केले आहेत. फडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरू आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. फडणवीसांनी स्वतः पत्रकार परिषद घेत मलिकांना उत्तर दिलं होतं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant patil) यांनीही नवाब मलिकांना एक सूचक इशारा दिला आहे. 'नवाब मलिक समीर वानखेडेंवर जे आरोप करत आहेत. त्याच्यातून येणाऱ्या परिणांची काळजी करावी पण भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये ओढण्याचे परिणाम भोगावे लागतील,' असा सूचक इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. 'महाविकास आघाडी प्रत्येकवेळी असा चेहरा उभा करत आहे ज्यातून मूळ सामान्यांच्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात महापुरामुळं पीक, जमीन वाहून गेली, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे नोंदवले जात आहेत. या प्रश्नांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नसल्यामुळं अशा प्रकारचे बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न चालला आहे,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 'मंत्रीमंडळातील अर्ध्ये मंत्री गायब तरी आहेत किंवा त्यांच्यावर आरोप तरी आहेत. अनिल देशमुखांची काळजी करण्याआधी ते वानखेडेंची काळजी करायला लागले आहेत. वानखेडेंच्या मागे समाज पूर्णपणे ठामपणे उभा राहिल. भाजपा अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यासोबत आहे,' असंही चंद्रकांत पाटील यानी म्हटलं आहे. वाचाः 'आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून आरोप केले जात आहे. नीरज गुंडे हा चांगला सामाजित कार्यकर्ता आहे. काही पुरावे असतील तर चौकशी करा. एक संजय राऊत कमी होते म्हणून नवाब मलिक जोडले गेले आहेत का?,' असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. वाचाः 'गेल्या १९ महिन्यात तुम्ही कोणाचाही चौकशी करु शकले नाहीत. उलट तुमच्या मंत्र्यांना राजीनामे करावे लागले. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही पण लोकांमध्ये घरोघरी त्यावर चर्चा होते. या १९ महिन्यात तुम्ही आमचे काही करु शकले नाहीत,' असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nIHEod

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.