Type Here to Get Search Results !

धावत्या एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना; पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेवर ओढवला भयानक प्रसंग

मुंबई: धावत्या एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचा तिघा सहप्रवाशांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या एक्स्प्रेसमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना १० ऑक्टोबर रोजी घडलेली आहे. पीडित महिला आणि तिचा पती सेंट्रल येथून मध्य प्रदेशातील इंदूरला चालले होते. ते दोघेही अवंतिका एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. महिलेच्या तक्रारीनुसार, ती आणि तिचा पती हे ट्रेनमध्ये बसल्यानंतर, त्यांच्या समोरच्याच सीटवर तिघे जण बसले होते. त्यांनी दारू प्यायली होती. तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. रात्री दहाच्या सुमारास, बोरिवली स्थानकावर ट्रेन आली असता, या तिघांनी केला. महिलेने तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, आरोपींपैकी एकाने तिला स्पर्श केला. तसेच इतर दोघांनी तिच्यावर आक्षेपार्ह कमेंट केल्या. या घटनेनंतर तिच्या पतीने त्यांना जाब विचारला आणि इतर प्रवाशांना या घटनेची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी पीडिता आणि तिचा पती इंदूरला पोहोचल्यानंतर तेथे पोलिसांत तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूर पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करून घेत, ती बोरिवली रेल्वे पोलिसांत वर्ग केली. या एक्स्प्रेसच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांची यादी रेल्वेकडून मागवून घेतली. त्यानंतर तपास करून पोलिसांनी मुंबईतून तिघांना अटक केली. हे तिघेही एका कुरियर कंपनीत काम करत होते आणि कामानिमित्त ते या ट्रेनमधून प्रवास करत होते. काही दिवसांनी ते मुंबईत परतले होते, असेही रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. तक्रारीनुसार, तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी विनयभंग केला, असा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच पुष्पक एक्स्प्रेसमध्ये हादरवणारी घटना घडली होती. काही लुटारूंनी इगतपुरी आणि कसारा स्थानकांदरम्यान एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3brcvzO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.