मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी आता ड्रग्ज प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देतात असे सांगत ते ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (opposition leader criticizes minister over his allegation on ) नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मला असं वाटतं की नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. कारण, रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा, त्या आधारे ट्विट करायचं आणि सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा अशी त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांत दिसतेय. वाचा: 'मलिक यांनी शपथेचा भंग केला आहे' यावेळी त्यांनी नवाब मलिक यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग केल्याचंही म्हटलं आहे. दरेकर म्हणाले की, मला वाटतं की मंत्री म्हणून शपथ घेताना भारतीय संविधानाने गुप्तता पाळण्याच्या बाबतीत ज्या काही चौकटी आणि अटी घातल्या आहेत त्यांचाही भंग होताना दिसतोय. याचे कारण म्हणजे व्यक्तिगत हेत्वारोप करणे, एखाद्याला जातीवरून बोलणे, हे संविधानाच्या गुपत्ता पाळण्याच्या अटीचा भंग आहे, असं मला वाटतं. अशा प्रकारे गुप्ततेचा भंग आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेत नवाब मलिक यांचा राजीनामाच मागितला पाहिजे. वाचाः समीर वानखेडे हे मु्स्लिमच आहेत असा हट्टाहास कशासाठी? समीर वानखेडे हे मु्स्लिमच आहेत असा त्यांचा हट्टाहास कशासाठी?, असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे. कोण कुठल्या जातीत जन्माला येतो याबाबत आपला हट्टाहास कशासाठी असायला हवा? हे लक्षात घेता नवाब मलिक यांनी शपथेचा भंग केलेला आहे आणि म्हणून त्यांचा राजीनामाच घ्यायला पाहिजे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bt07iC