मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री () यांची एनसीबीचे विभागीय संचालक (Sameer Wankhede) यांच्या पत्नी अभिनेत्री () आणि त्यांचे वडील (Dnyandeo Redkar) यांनी भेट घेतली. या भेटीनंतर आठवले यांनी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री (Nawab Malik) यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात आघाडी उघडली असल्याचे आठवले म्हणाले. यावेळी आठवले यांनी वानखेडे कुटुंबियांना पाठिंबा जाहीर केलाय. (Union Minister Ramdas Athavale backs and says all allegations made by are false) वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांची आठवलेंशी सुमारे अर्धा तास चर्चा झाली. ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्याला त्यांच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे दाखवली, असे आठवले या भेटीनंतर म्हणाले. आठवलेंचे मलिक यांना आवाहन वानखेडे कुटुंबीयांच्याभेटीनंतर आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे नवाब मलिक यांच्यावर आरोप केले. मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात आता मोर्चा वळवला आहे,असे आठवले म्हणाले. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे असे असून ते मुस्लिम कधीही नव्हते. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केले हे खरे आहे. ते उच्चशिक्षित आहेत. एक्साईज विभागात त्यांनी काम केले आहे. त्यांनी सर्व कागदपत्रे आम्हाला दाखवली आहेत, असे सांगतानाच नवाब मलिक यांनी आता समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत, असे आवाहनही आठवले यांनी मलिक यांना केले आहे. क्लिक करा आणि वाचा- आठवलेंच्या भेटीनंतर क्रांती रेडकर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. वानखेडे यांच्यावर ते रोज नवा आरोप करत आहेत. हे आरोप करत असताना ते काही कागदपत्रेही दाखवत आहेत. मात्र, ते करत असलेले सर्व दावे आणि मांडत असलेले सर्व पुरावे खोटे आहेत, असा दावा अभिनेत्री रेडकर यांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्रीय मंत्री रामदास आठवले आम्हाला भेटले हे कुणाला दुर्देवाचे वाटत असेल तर मग आम्ही जायचे तरी कुठे?, एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहणे चुकीचे आहे का? असे सवाल रेडकर यांनी उपस्थित केले आहेत. आम्ही आठवले यांना आमच्याकडील सर्व कागदपत्रे दाखवलेली आहेत. नवाब मलिक हे प्रसारमाध्यमांसमोर येत काही कागदपत्रे दाखवत असतात. मात्र त्यांनी दाखवलेली कागदपत्रे तुम्ही सत्य मानत असाल तर कृपया डोळे उघडा अशी माझी सर्वांना हातजोडून विनंती आहे, असेही क्रांती रेडकर म्हणाल्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ECFXj3