Type Here to Get Search Results !

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर नवा आरोप; 'नोकरी वाचवण्यासाठी...'

मुंबई: एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक आणि कुटुंबीयांवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांचे हल्ले सुरूच आहेत. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत आणि धर्म लपवण्याचा खेळ २०१५ पासून वानखेडे कुटुंबाने सुरू केला. त्यातूनच वानखेडे यांनी पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली, असा दावा करत मलिक यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष यांनाही लक्ष्य केले. ( ) वाचा: मुंबईतील प्रकरण समोर आल्यानंतर नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. वानखेडे यांचा जन्माचा दाखला ट्वीटरवर शेअर करत वानखेडे यांचे खरे नाव असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे हे मुस्लिम आहेत की मागासवर्गीय आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मलिक यांचे सर्व आरोप फेटाळणाऱ्या वानखेडे यांनी शनिवारी मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यानंतर हलदर यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना वानखेडे यांनी कोणतेही धर्म परिवर्तन केलेले नाही, असे हलदर म्हणाले. आज मलिक यांनी याच विधानाचा समाचार घेतला. अरुण हलदर हे भाजपचे नेते असले तरी ते आता एका संवैधानिक पदावर बसले आहेत. या पदाची प्रतिष्ठा त्यांनी राखली पाहिजे. तुमच्याकडे एखादी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि त्याचा अहवाल बनवून संसदेत ठेवला गेला पाहिजे. कुणीतरी तुम्हाला येऊन भेटतं आणि तुम्ही मीडियासमोर येऊन क्लीन चिट देता म्हणजेच 'दाल में कुछ तो काला है.' जो मागासवर्गीय नाही तो मागावर्गीयांचे अधिकार हिसकावतो आहे, इतकेच मला सांगायचे असून धर्मांतर केल्यास जातीचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत, हे आदेश तुमच्याच सरकारचे आहेत, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले. वाचा: 'समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांच्या कुटुंबातील सर्व जण मुस्लिमच होते. समीर यांनी जातीच्या बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली. २०१५ पासून जातीबाबतची वस्तुस्थिती त्यांनी लपवली. फेसबुक प्राफाइलवर जिथे दाऊद वानखेडे उल्लेख होता तिथे डी. के. वानखेडे लिहायला सुरुवात केली. त्यानंतर वडिलांचं जे जुनं नाव ज्ञानदेव होतं ते लिहायला सुरुवात केली. नोकरी धोक्यात येईल हे लक्षात आल्यावर नाव बदलण्याचा हा खेळ ह्यांनी घरात सुरू केला. दाऊदचं ज्ञानदेव केलं. बहिणीचं नाव बदललं. पहिलं लग्नही याच कारणातून मोडलं', असा दावा मलिक यांनी केला. वानखेडे यांच्या जातीच्या दाखल्याबाबत सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pPsGzm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.