अकोला: अकोला जिल्हा परिषदेतील दोन्ही सभापतीपदांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव करीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केल्याने आघाडीचा विजय सुकर झाला. वंचितला २४ तर महाविकास आघाडीला २९ मते मिळाली. तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रहार जनशक्ति पक्षाच्या स्फूर्ती गावंडे, तर विषय समिती सभापतीपदी अपक्ष सदस्य सम्राट डोंगररदिवे विजयी झाले. मात्र, सर्वाधिक सदस्यसंख्या असूनही पराभव झाल्याने हा निकाल सत्ताधारी वंचितसाठी धक्का मानला जात आहे. ( lost the election for the posts of chairman and the mahavikas alliance won) जानेवारी २०२० मध्ये जि.प.,पं.स. निवडणुका झाल्या होत्या. मात्र ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने ४ मार्च रोजी ओबीसी मागास प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि ६ ऑक्टोबर रोजी निकालही जाहीर झाला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतींच्या दोन जागांसाठी शुक्रवारी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. क्लिक करा आणि वाचा- असे जुळले समीकरण पोटनिवडणुकीनंतर वंचितचे संख्याबळ २३ इतके झाले. शिवसेना- १३ (एक सदस्या काही दिवसांपूर्वी अपात्र झाली असून, सध्या प्रकरण प्रलंबित आहे), भाजप-५, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी ४, प्रहार जनशक्ती पक्षाला १ व तीन अपक्ष सदस्य आहेत. त्यांपैकी एक अपक्ष सम्राट डोंगरदिवे यांनी महाविकास आघाडीकडून सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली. तर, भाजपने प्रहारला पाठिंबा दिल्याने महिला व बालविकास सभापतीपद स्फूर्ती गावंडे यांच्याकडे आले असून विषय समिती सभापतीपदी सम्राट डोंगरदिवे बिनविरोध निवडून आले. क्लिक करा आणि वाचा- वंचित बहुजन आघाडीच्या योगिता रोकडे व संगिता अढाऊ या दोघींनीही महिला व बाल विकास समिती सभापतीपदासाठी अर्ज भरला. परिणामी विषय समिती सभापतीसाठी डोंगरदिवे एकटेच रिंगणात राहिले. नंतर अढाऊ यांनी अर्ज मागे घेतला आणि रोकडे व प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांच्यात लढत झाली. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mrdZR5