Type Here to Get Search Results !

राज्यातील एका मंत्र्याने १०० कोटींची सुपारी घेतली; भाजपचा गंभीर आरोप

मुंबई: महापालिकेच्या काळ्या यादीतील कंत्राटदारांना 'पावन' करून घेण्यासाठी सरकारमधील एका मंत्र्याने १०० कोटींची सुपारी घेतल्याचा खळबळजनक दावा भाजप प्रदेश कोषाध्यक्ष, आमदार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. २०१७-१८ मध्ये या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यांना पावन करून घेण्याचा प्रयत्न हा मंत्री व त्याचा नातलग करत आहेत. हे उद्योग न थांबल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडे तक्रार दाखल करू, असा इशाराही कोटेचा यांनी दिला. कोटेचा यांनी हे आरोप करताना कोणाचेही नाव मात्र घेतलेले नाही. ( ) वाचा: आमदार कोटेचा म्हणाले की, ९७५ कोटींच्या रस्ते बांधणीत गैरप्रकार केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या ९ कंत्राटदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाईही सुरू केली होती. त्यावेळी कंत्राटदारांबरोबर पालिकेच्या संबंधित अभियंत्यांवरही कारवाई केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कंत्राटदार आणि अभियंत्यांना तुरुंगात जावे लागले होते. या कंत्राटदारांना ७ वर्षे काळया यादीत टाकण्यात आले होते. या प्रकरणाची फाइल अजून बंद झालेली नसताना या कंत्राटदारांना पावन करून घेण्याची 'सुपारी' महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याने व त्याच्या मावसभावाने घेतली आहे. या कंत्राटदारांना महापालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या २२०० कोटींच्या भरता येणार आहे. वाचा: यापैकी या एका कंत्राटदाराला पालिकेच्या खातेअंतर्गत चौकशीच्या माध्यमातून निर्दोष ठरविण्यात आले आहे. या विरोधात आपण लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालकांकडे मुंबई पालिकेच्या रस्ते प्रकल्प संचालकांची चौकशी करण्याची मागणी करणार आहे, असे आमदार कोटेचा यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मुंबई पालिकेतील भाजप गटनेते विनोद मिश्रा , प्रदेश प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ, माजी नगरसेवक प्रवीण छेडा उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pWBFP4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.