Type Here to Get Search Results !

'काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, ते परवडले; पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही'

सूर्यकांत आसबे । २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपनं 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा दिली होती. पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक भाषणात 'काँग्रेसमुक्त भारत' हा शब्दप्रयोग ऐकायला मिळायचा. ती भूमिका भाजपनं बदलली की काय, अशी शंका वाटण्यासारखं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलं आहे. (BJP Leader ) सोलापुरात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चक्क नेत्यांचं कौतुक केलं. 'काँग्रेसचे नेते वेल कल्चरड आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही', असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ' पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते सुसंस्कृत आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भुलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. वाचा: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा देऊ केला होता. २०१९ मध्ये अजित पवार यांनी काही आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथही घेतली होती. मात्र, दीड दिवसांतच राजीनामा देत त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर भाजपला बाजूला ठेवून राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिवसेनेबरोबरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधांमध्ये वितुष्ट आलं आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या सर्वाधिक नेत्यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसच्या बाबतीत मात्र भाजपनं सौम्य भूमिका घेतल्याचं दिसत आहे. भाजपचे नेतेही महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना शिवसेना व राष्ट्रवादीवर टीका करताना दिसतात. आजही पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला. मात्र, ते करताना त्यांनी काँग्रेसचं चक्क कौतुक केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vShx1K

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.