Type Here to Get Search Results !

बुलडाण्यात स्टेट बँकेवर मोठा दरोडा, चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून...

मनोज जयस्वाल। जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील केळवद (Kelwad) येथील स्टेट बँकेच्या (Robbery at State Bank) शाखेवर २० लाखाचा दरोडा पडल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेनऊच्या वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. सकाळी बँकेचा शिपाई बँक उघडण्यासाठी आला आला असता ही बाब लक्षात आली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी वरिष्ट पोलीस अधिकारी व श्वान पथक दाखल झाले होते. रात्रीच्या दरम्यान खिडकीचे गज वाकवून चोरटे बँकेत शिरले. गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडली आणि त्या तिजोरीतून २० लाख ८१ हजार ५७५ रुपये चोरी करून पळ काढला. सकाळी शिपाई बँकेत आला, तेव्‍हा खिडकीचे गज वाकवलेले गेल्याचे पाहून त्‍याला चोरीचा संशय आला आणि त्‍याने बँकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. वाचा: स्टेट बँकेची शाखा केळवदमध्ये किन्‍होळा रोडवर आहे. अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना कळवले. त्‍यानंतर पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे हेही घटनास्‍थळी आले आहेत. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने बँकेच्‍या बाजूच्‍या शेतापर्यंत माग काढला. तिथे दरोडेखोरांचे हँडग्‍लोज व बॅटरी मिळाली. सीसीटीव्‍हीत दरोडेखोर कैद झाल्याची शक्‍यता असून, सीसीटीव्‍हीचे फूटेज तपासले जात आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vZl0LN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.