Type Here to Get Search Results !

शरद पवारांची पाठ फिरताच विखेंच्या लोणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

अहमदनगर: राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील () यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळात प्रवेश केला. त्यामुळे सरपंच जनार्दन घोगरे यांची सत्ता अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते () यांनी लोणी खुर्दमध्ये भेट दिली होती. घोगरे यांना ‘कामाला लागा’ असा संदेशही त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची पाठ फिरताच चार सदस्यांनी घोगरे यांची साथ सोडल्याचे पहायला मिळाले. (immediately after sharad pawars visit four gram panchayat members of ncp joined radhakrishna vikhe patils janseva mandal) सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या गावात विखे यांच्या मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव घोगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने तेथे विजय मिळविला होती. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी ११ जागा जिंकून त्यांनी विखे यांच्या गटाकडून सत्ता खेचून आणली होती. विखे समर्थकांना या अवघ्या ६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर जनार्दन घोगरे पाटील संरपंच झाले आहेत. हा पराभव विखे यांच्या जिव्हारी लागला होता. क्लिक करा आणि वाचा- आता मात्र तेथे पुन्हा राजकीय घडामोडी घडल्या. शनिवारी सत्ताधारी परिवर्तन मंडळाचे सदस्य शरद आहेर, संगीता तुपे, प्रदीप ब्राह्मणे व मायकल ब्राह्मणे यांनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनसेवा मंडळात प्रवेश केला. आता सत्ताधारी परिवर्तन मंडळाकडे अवघे ६ सदस्य उरले आहेत. तर विरोधी सदस्यांची संख्या १० झाली आहे. एक जागा रिक्त आहे. आता पुढे काय घडामोडी होणार, सत्ता परिवर्तनाची प्रक्रिया कशी असेल, यासंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभासाठी आले होते. त्यावेळी परत जाताना ते लोणी खुर्दमध्ये थांबले होते. घोगरे पाटील जुन्या काळापासून पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. सरपंच घोगरे यांनी पवार यांचे गावात जंगी स्वागत केले. काही वेळ थांबून पवारांनी सत्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी घोगरे यांच्यासह कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’, असा संदेश दिल्याची चर्चा सुरू आहे. त्याला काही दिवस होताच ही नवीन राजकीय घडामोड गावात घडली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vYzjjL

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.