मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज कारवाई प्रकरण बनावट असल्याचं सांगून () यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Nawab Malik) यांनी आज भाजपला लक्ष्य केलं. 'आर्यन खान प्रकरणात पंच असलेला व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेला () याची भाजपच्या नेत्यासोबत पार्टनरशीप आहे, असा दावा मलिक यांनी केला. 'हिवाळी अधिवेशनात यापेक्षाही स्फोटक माहिती मी उघड करणार आहे, त्यानंतर भाजपच्या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही,' असा इशारा मलिक यांनी दिला. वाचा: मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी आज अनेक धक्कादायक खुलासे केले. 'क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत काशिफ खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. पार्टी आयोजित करणाऱ्यांपैकी तो एक होता. काशिफ हा फॅशन टीव्हीचा 'इंडिया हेड' आहे. देशभर फॅशन शो आयोजित करतो. या शोमध्ये बेधडक ड्रग्ज विकलं जातं. मोठ्या प्रमाणावर सेक्स रॅकेट चालवण्याचं काम तो करतो. क्रूझवरील ड्रग पार्टीची आमंत्रणं त्यानं सोशल मीडियावरूनही पाठवली होती. मात्र, त्याला अटक करण्यात आली नाही, कारण तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे. एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांनी अनेकदा त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी वानखेडे यांनी काशिफ खानला वाचवलं. काशिफ खानला अटक झाल्यानंतर सगळं काही समोर येईल. त्याच्याकडं किती लोकांचे पैसे आहेत हेही उघड होईल,' असं मलिक यांनी सांगितलं. वाचा: समीर वानखेडे यांनी मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणून ते वानखेडेंवर व एनसीबीवर आरोप करत आहेत. ड्रग्ज माफियांना वाचवत आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. त्यांनाही मलिक यांनी आज उत्तर दिलं. 'भाजपचे काही नेते आणि त्यांचे राइट हँड कालपासून समीर वानखेडेंना भेटत आहेत. पोपटाला वाचवण्यासाठी सगळी पळापळ सुरू आहे. एनसीबीच्या अनेक प्रकरणात पंच असलेला गुन्हेगार प्रवृत्तीचा किरण गोसावी याच्यासोबत भाजपच्या एका नेत्याच्या पत्नीची एका खासगी कंपनीत पार्टनरशीप आहे. मी आता नाव उघड करणार नाही. हिवाळी अधिवेशनात सगळं काही सांगेन. हे सगळं जेव्हा उघड होईल, तेव्हा जावयाच्या नावानं मला टार्गेट करणाऱ्या भाजपवाल्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही,' असा गर्भित इशाराच त्यांनी दिला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bmK7ik