Type Here to Get Search Results !

बाळासाहेब ठाकरे आज नसले तरी...; राऊतांचे क्रांती रेडकरला उत्तर

मुंबईः आर्यन खान ड्रग्ज (aryan khan drug case)प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांमुळं त्यांचे कुटुंबीयही त्रस्त झाले आहेत. समीर वानखेडे यांच्या पत्नी (Kranti Redkar) हिनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Cm Uddhav Thackeray)पत्र लिहत न्याय देण्याची मागणी केली होती. क्रांतीच्या पत्रानंतर आता शिवसेना खासदार (Sanjay Raut)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कोणी टीका- टिपण्णी केलीये असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देतात. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का?,' असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 'क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी आहेत. शिवसेना तीच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कोणावरही अन्याय होणार नाही,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वाचाः 'दिल्लीतून तपास यंत्रणांचे आक्रमण सुरू आहे. कारण नसताना मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होतोय. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर धाडी पडल्यात. अशोक चव्हाण, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का?, इथं मराठी तर सगळेच आहेत,' असा टोला राऊतांनी लगावला आहे. तसंच,' प्रश्न मराठी अमराठी असण्याचा नाही, सत्य असत्याचा आहे. क्रांतीवर अन्याय होणार नाही. पण केंद्राच्या यंत्रणा राज्यात ज्या प्रकारे मागे लागल्यात व त्यानंतर आता ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामुळं सगळ्यांना घाम फुटायला लागला आहे,' असं संजय राऊत म्हणाले आहेत. वाचाः क्रांती रेडकर काय म्हणाली होती? माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा घेऊन मी आज माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरुद्ध उभी आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच हे पटलं नसतं. आज ते नाहीत पण तुम्ही आहात. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचं नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे, असं क्रांती रेडकरनं म्हटलं होतं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CugrLW

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.