Type Here to Get Search Results !

...तोपर्यंत हा पिक्चर सुरूच राहील; नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई: 'माझी लढाई कोणाच्याही कुटुंबाविरुद्ध नाही. सरकारी यंत्रणांच्या आडून बोगस कारवाया करणाऱ्या व निरपराध नागरिकांना तुरुंगात डांबणाऱ्यांविरुद्ध आहे. आर्यनचा जामीन हा या पिक्चरचा इंटरव्हल आहे, आता क्लायमॅक्स सुरू झालाय. आणि कंपनीचे सर्व बोगस कारनामे समोर येत नाहीत आणि निष्पाप लोक तुरुंगातून सुटत नाहीत, तोपर्यंत हा पिक्चर सुरूच राहील,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Nawab Malik) यांनी आज दिला. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. आर्यनच्या जामिनानंतर काल मलिक यांनी 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' असं ट्वीट केलं होतं. त्यामुळं मलिक आज काय नवा गौप्यस्फोट करणार याबद्दल उत्सुकता होती. आज त्यांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर हल्लाबोल केला. 'साधारण महिनाभरात परिस्थिती बदललीय. धरपकडीची कारवाई करणारे आता स्वत: पळताहेत आणि संशयितांना पकडून नेणारे गजाआड आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडं मी याबाबत तक्रार केलीय. नऊ महिन्यात मी जी काही माहिती मिळवलीय. त्यात राज्य सरकारची कुठलीही मदत मी घेतलेली नाही. कुटुंबाच्या मदतीनं मी हे पुरावे गोळा केले आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा लढत असतो, तेव्हा त्याची मदत करण्यासाठी अनेक लोक पुढं येतात, अशी लोकांचीही मला मदत झालीय,' असं मलिक म्हणाले. वाचा: 'समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या धाडींच्या वेळी जे जे पंच उभे केले होते, ते बहुतेक लोक फ्रॉड आहेत. फ्लेचर पटेल हा आर्मीच्या नावाखाली अनेक गोष्टी करत असतो. समीर वानखेडेंशी त्याचे उत्तम संबंध आहेत. आदिल उस्मानी हा सुद्धा अनेक प्रकरणात पंच आहे. वानखेडे कस्टम विभागात ड्युटीवर असताना उस्मानीशी त्यांची मैत्री झालीय. हा आदिल उस्मानी इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करतो. त्याच्याबद्दलची माहिती मी पुढं आणणार आहे,' असं नवाब मलिक म्हणाले. 'इंटरव्हलनंतरची कथा मी सांगेन, असं संजय राऊत म्हणालेत. आता सलीम-जावेदप्रमाणे आम्हा दोघांना हा पिक्चर पुढं न्यावा लागेल असं दिसतंय,' अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pNyGZj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.