Type Here to Get Search Results !

काशिफ खान अखेर आला समोर; मलिक यांचे 'ते' आरोप फेटाळले, म्हणाला...

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीत सहभागी झालेला 'तो' दाढीवाला कोण?, असा सवाल मंत्री यांनी केला होता. त्यानंतर ही व्यक्ती म्हणजे आहे, असे आज उघड करत मलिक यांनी काशिफवर गंभीर आरोप केले आहेत. काशिफ हा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांचा मित्र असल्याचाही मलिक यांचा दावा आहे. मात्र, याने समोर येत त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ( ) वाचा: 'काशिफ खान याने क्रूझवरील ड्रग्ज पार्टीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तो त्या पार्टीतही सहभागी झाला होता. समीर वानखेडे आणि त्याची मैत्री आहे. काशिफ हा ड्रग्ज रॅकेटसोबतच पोर्न आणि सेक्स रॅकेटही चालवतो. त्याला अटक करून चौकशी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील', असा दावा नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर काशिफ खान याने एका वृत्तवाहिनीकडे प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. मंत्री मलिक यांनी केलेले आरोप निराधार आहेत. माझा ड्रग्ज, पोर्न वा कोणत्याही रॅकेटशी संबंध नाही, असे काशिफ खान याने म्हटले आहे. क्रूझवर आयोजित केलेल्या पार्टीत फॅशन टीव्ही इंडिया एक प्रायोजक होती. मी स्वत:ही तिकीट घेऊन पार्टीला गेलो होतो. तेथील रूम तसेच खाण्यापिण्याचे पैसे क्रेडिट कार्डच्या माधमातून मी दिले. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे काशिफ खान म्हणाला. नवाब मलिक यांचे आरोप ऐकून मला धक्का बसला आणि तितकंच आश्चर्यही वाटलं. ते एक मंत्री आहेत आणि मोठी ताकद त्यांच्याकडे आहे. मी त्यांचा सन्मानही करतो. मात्र, त्यांनी बेछूट आरोप करणं योग्य नाही. त्यांनी आधी सत्यस्थिती जाणून घ्यावी आणि मगच आरोप करावेत. ते म्हणतात त्याप्रमाणे माझा कोणत्याही ड्रग किंवा पोर्न रॅकेटशी संबंध नाही, असेही काशिफ खानने स्पष्ट केले. वाचा: आर्यन खानबाबत विचारले असता, आर्यनला आपण क्रूझवर पाहिलं नाही आणि मी त्याला ओळखतही नाही, असे काशिफ खान म्हणाला. क्रूझवरील पार्टीत कुणी ड्रग्ज आणलं असेल किंवा बाळगलं असेल तर त्याची कोणतीच माहिती मला नाही, असेही त्याने सांगितले. समीर वानखेडे यांच्यासोबत मैत्रीचाही त्याने इन्कार केला. एनसीबीच्या या अधिकाऱ्याला मी कधीही भेटलेलो नाही किंवा माझे त्यांच्याशी कधी बोलणेही झालेले नाही, असे काशिफ म्हणाला. याप्रकरणात कोणत्याही तपास यंत्रणेला माझी चौकशी करायची असल्यास त्या चौकशीस सामोरे जाण्याची व यंत्रणेला सहकार्य करण्याची माझी तयारी आहे, असे काशिफने नमूद केले. क्रूझवरील पार्टी दिल्लीतील एका कंपनीने आयोजित केली होती. या कंपनीच्यावतीने काही व्यक्ती मला भेटल्या होत्या. त्या व्यक्तींना मी ओळखत नाही. केवळ या पार्टीला प्रायोजकत्व आम्ही दिलं. इतकाच आमचा संबंध आहे. बाकी त्या पार्टीत कोण आलं आणि कुणी काय आणलं, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असेही काशिफ याने स्पष्ट केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31fb1XC

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.