Type Here to Get Search Results !

राज्यात मोठा दूध घोटाळा; विखेंचा गंभीर आरोप, 'या' मंत्र्याकडे रोख

अहमदनगर : ‘मागील सरकारने दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता अनेक दूध संघांनी ते पैसे हडप केले आहेत. संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकऱ्यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले. अशा दूध संघांचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशात भंडाफोड करणार आहोत,’ असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी दिला. त्यांनी संगमनेरमधील दूध संघाचे नाव घेऊन थेट महसूलमंत्री यांच्याकडेच इशारा केला आहे. ( ) वाचा: राहुरी तालुक्यातील एका दूध संघाच्या कार्यक्रमात विखे बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. विखे पाटील म्हणाले, ‘करोना काळात अधिवेशनाला मर्यादा होत्या. त्यामुळे अनेक प्रश्न असूनही ते मांडता येत नव्हते. करोनाच्या नावाखाली सरकारने अनेक गोष्टी रेटून नेल्या. आता करोनाचे संकट कमी झाल्याने नागपूरमधील हिवाळी अधिवेशन पुरेसा काळ चालेल अशी अपेक्षा आहे. त्यावेळी दूध संघांनी शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले, याचा आपण भांडाफोड करणार आहोत. दुधाचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे तत्कालीन सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले. मात्र, अनेक दूध संघांनी हे पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलेच नाहीत. त्यांचा अधिवेशनात भांडफोड करणार आहे. संगरनेरमधील एका सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांकडून वर्षभर दुधाचे पैसे कापले. नंतर तेच त्यांना परत दिले. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसेच परत देत अनुदान दिल्याचे सांगितले. ही गोष्ट तेथील शेतकऱ्यांच्याही लक्षात आली आहे. या विरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत,’ असे सांगत विखे यांनी थोरात यांच्याशी संबंधित दूध संघाकडेच इशारा केला आहे. वाचा: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने टीका करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा मंत्री यांच्यावरही विखे पाटील यांनी टीका केली. मलिक यांनी जावयाकडे सापडलेला पदार्थ म्हणजे हर्बल तंबाखू असल्याचे म्हटले होते. त्यावरून विखे पाटील यांनी टोला हाणला. विखे पाटील म्हणाले, ‘मलिक यांनी शोधलेल्या या वनस्पतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. तिची लागवड करण्याची परवागी देत बियाणेही उपलब्ध करून द्यावे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न तरी वाढले. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अशी मागणी करीत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात फक्त हा एकच विषय चर्चेत आहे. यामुळे इतर विषय मागे पडले आहेत,’ अशी टीकाही विखे पाटील यांनी केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3br8jjt

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.