Type Here to Get Search Results !

लोकल सुरू करण्याचा निर्णय 'त्या' चर्चेनंतरच; BMC आयुक्तांची माहिती

मुंबई: कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री यांनी रविवारी याबाबत घोषणा केली आहे. या निर्णयावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये राजकारण रंगलं आहे. हा निर्णय घेताना केंद्राला विश्वासात घेतलं नसल्याचं रेल्वे राज्यमंत्री यांनी म्हटलं होतं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या संदर्भातील वस्तुस्थिती विषद केली आहे. (BMC Commissioner ) वाचा: मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी काही बोलू इच्छित नाही किंवा आरोप करू इच्छित नाही. मात्र, याबाबतचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन झालेला आहे, असं चहल म्हणाले. 'मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी हे गुरुवारी स्वत: माझ्या चेंबरमध्ये आले होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकही त्यांच्यासोबत होते. लोकल सुरू करण्याविषयी आमची एक तास चर्चा झाली. लोकल सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, असं म्हणणं त्यांनीही मांडलं. मासिक पास, क्यूआर कोड या संदर्भातही चर्चा झाली. रेल्वेकडं सध्या जे स्कॅनर आहेत, ज्याच्या मदतीनं रेल्वे पास स्कॅन केले जातात, त्याच स्कॅनरचा उपयोग करून महापालिकेनं मुंबईकरांना दिलेले पास स्कॅन करता येतील, असंही आमचं बोलणं झालं होतं. या चर्चेची संपूर्ण माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे,' असं चहल यांनी स्पष्ट केलं. वाचा: 'दोन डोस घेतल्याची खात्री करून मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी देण्यात येणारा पास भविष्यातही अन्य ठिकाणीही उपयोगात आणला जाणार आहे. रेस्टॉरंट, जीम, मॉलमध्ये प्रवेशासाठी हा पास आवश्यक केला जाईल. त्यामुळं नागरिकांनी लवकरात लवकर लस घ्यावी,' असं आवाहनही चहल यांनी केलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VCJVaq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.