Type Here to Get Search Results !

शेअर बाजारात हवा निर्माण करणाऱ्या 'झोमॅटो'चे कर्मचारी संपावर

मुंबई: शेअर बाजारात दणदणीत एन्ट्री करणाऱ्या 'झोमॅटो' कंपनीपुढं नवं संकट उभं राहिलं आहे. ग्राहकांच्या घरोघरी जाऊन ऑर्डरची डिलिव्हरी देणारे 'झोमॅटो बॉय' कालपासून संपावर गेले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळं ग्राहकांना डिलिव्हरी मिळत नसल्याचं चित्र आहे. दुचाकीवरून घरोघरी जाऊन ग्राहकांना हवे ते खाद्यपदार्थ वेळेत पुरवणारे झोमॅटो बॉय मोठ्या शहरात जागोजागी दिसतात. या 'झोमॅटो बॉय'ना एक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून २५ रुपये मानधन दिले जाते. हे मानधन अत्यल्प आहे. पेट्रोलचे दर सध्या १०८ रुपयांपर्यंत पोहोचल्यानं अवघ्या २५ रुपयांमध्ये डिलिव्हरी करणं परवडत नसल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, कंपनीकडून त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्यानं या कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. वाचा: 'झोमॅटो'चा आयपीओ मागील महिन्यात सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. 'झोमॅटो'च्या लोकप्रियतेमुळं या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. किरकोळ गुंतवणूकदार, संस्थात्मक गुंतवणूकदार (क्यूआयबी) तसेच नोकरदार वर्गानं या आयपीओला जोरदार प्रतिसाद दिला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yu5tEq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.