Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याने वाढवलं टेन्शन; रुग्णसंख्येत दुप्पट वाढ

साताराः राज्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्यानं काही राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, काही जिल्ह्यांत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. () पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यात करोनासंसर्गाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. साताऱ्या जिल्ह्यात गुरूवारी रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळं साताऱ्या जिल्ह्यानं टेन्शन वाढवलं आहे. आरोग्य विभागानंही साताऱ्या जिल्ह्यातील रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी, करोना नियमांचे उल्लंघन ही कारण रुग्णवाढीला कारणीभूत ठरत असल्याची शक्यता आहे. साताऱ्यात गुरुवारी ९५१ रुग्णांची नोंद झाली आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा दुप्पट करोनारुग्ण एकट्या सातऱ्यांत आढळले आहेत. त्यामुळं रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. साताऱ्यात एकूण २ लाख २२ हजार २१० रुग्णसंख्या असून आत्तापर्यंत २ लाख ०९ हजार ३०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, संपूर्ण जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९४. २ इतका असून जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ हजार ५१६ आहे. वाचाः ऑगस्टअखेरीस करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात सण साजरे केले जातात. त्या दरम्यान गर्दी होऊन पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागानं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. साताऱ्यात लसीकरणावर भर राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये करोना साथरोगाचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, त्यानुसार आरोग्य यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. चारही जिल्ह्यांत सध्या करोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. वाचाः दरम्यान, राज्यात गुरुवारी सात हजार १२० करोनाबाधित बरे होऊन घरी परत गेले आहेत. त्यातुलनेत दिवसभरात सहा हजार ६९५ नवीन करोनारुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या २४ तासांत १२० करोनारुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ClOZAx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.