Type Here to Get Search Results !

गुजरातच्या व्यापाऱ्याने जीएसटी विभागाला ४ कोटींनी गंडवलं, अशी फसवणूक केली की वाचून हादराल

सांगली : गुजरातमधील मेहसाना येथील सम्राट एंटरप्राइजेस या कंपनीने सांगली जिल्ह्यात खोबऱ्याचा ८० कोटी रुपयांचा व्यापार केल्याचे कागदोपत्री दाखवून जीएसटी विभागाची चार कोटी रुपयांची फसवणूक केली. बनावट कागदपत्रांवरून फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध सुरू आहे. या तपासात खरेदी-विक्रीची बनावट कागदपत्रे तयार करून जीएसटी विभागाकडून परतावा उकळणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर चोरी टाळण्यासाठी सरकारने वस्तू व सेवा कर पद्धतीची अंमलबजावणी सुरु केली. मात्र यातही काही कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून बनावटगिरी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. कागदोपत्री व्यवहार दाखवून जीएसटीचा परतावा उकळला जातो. असाच एक प्रकार सांगलीतील जीएसटी विभागाच्या तपासणीत समोर आला आहे. कर्नाटक पोलिसांनी पकडलेल्या एका वाहनाच्या चौकशीत सांगलीत नोंदणीकृत असलेल्या गुजराती कंपनीचे नाव समोर आले. वाहन चालकाच्या सांगण्यानुसार तो सम्राट एंटरप्राइजेस या कंपनीसाठी खोबऱ्याची वाहतूक करीत होता. संशय बळावल्याने कर्नाटक पोलिसांनी याचा तपास सांगलीतील जीएसटी विभागाकडे सोपवला. जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केल्यानंतर कंपनीच्या सांगलीतील पत्त्यावर कोणतेही कार्यालय आढळले नाही. कंपनीचे लाईट बिल बनावट होते. जीएसटी विभागाकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार या कंपनीने गेल्या वर्षभरात खोबरे खरेदी-विक्रीचा 80 कोटी रुपयांच्या व्यापार केला आहे. पाच टक्के जीएसटीनुसार कंपनीला चार कोटी रुपयांचा परतावा मिळाला. प्रत्यक्षात जो व्यवहार झालाच नाही, त्याचा परतावा घेऊन कंपनीने जीएसटी विभागाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. सम्राट एंटरप्राईजेस या कंपनीचा मूळ पत्ता गुजरातमधील मेहसाना येथील आहे. अधिक तपासासाठी जीएसटी विभागाचे पथक गुजरातकडे रवाना झाले आहे. या तपासातून जीएसटी विभागाची फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फास्टॅगवरून झाला उलगडा कर्नाटक पोलिसांनी पकडलेल्या वाहनात काही कागदपत्रे मिळाली होती. या कागदपत्रांमध्ये सम्राट एंटरप्राइजेस या कंपनीचा सांगलीतील पत्ता मिळाला. वाहन चालकाच्या सांगण्यानुसार तो सांगलीतील कंपनीसाठी खोबऱ्याची वाहतूक करीत होता. पोलिसांनी फास्टॅगवरून वाहनाच्या प्रवासाची माहिती घेतली असता, संशयित वाहन एकदाही सांगलीत गेले नसल्याचे लक्षात आले. यावरून सम्राट एंटरप्राईजेसच्या बनावटगिरीचा उलगडा झाला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A9mFiX

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.