Type Here to Get Search Results !

तुळजापूरचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी आलुरे गुरूजी यांचं निधन

उस्मानाबादः तालुक्याचे माजी आमदार सी. ना. आलुरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. सोलापुरातील रुग्णलयात गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३ नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत सी. ना. आलुरे हे गुरुजी या नावाने परिचित होते. राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. शिक्षण महर्षी म्हणूनही तालुक्यात त्यांची ओळख होती. अणदूरच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या माधम्यातून त्यांनी तालुक्यातील विविध भागांत शिक्षणाचे जाळे विणले आहे. अणदूर परिसरात त्यांनी एकूण २८ शाळा सुरु केल्या आहेत शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संस्थेचे सचिव म्हणूनची त्यांनी काम पाहिलं आहे. १९८० साली ते आमदार होते. आलुरे हे काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले. त्यांनी शेकापचे तत्कालीन आमदार माणिकराव खपले यांचा पराभव करून विजय मिळविला होता. आलुरे गुरुजी हे तुळजाभवानी साखर कारखान्याचे माजी अध्यक्षही होते. बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानातही ते सहभागी झाले होते. तुळजापूरमध्ये अभियांत्रिकी कॉलेज असो किंवा गरिब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करणं असो, आलुरे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zXnZoY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.