Type Here to Get Search Results !

अवघा महाराष्ट्र हळहळला! १६ कोटींच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू

पुणेः लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शनची व्यवस्था केल्यानंतरही पुण्यातील () या चिमुकलीचं निधन झालं आहे. रविवारी संध्याकाळी खेळत असताना वेदिकाला श्वास घेण्यास अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्लुअर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजारा झाला होता. या आजारावर मात करण्यासाठी वेदिकाला १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज होती. त्यानंतर तिच्या आई- वडिलांनी वेदिकासाठी लोकवर्गणीतून १६ कोटी जमा केले होते. या पैशातून वेदिकाला जून महिन्यात १६ कोटी रुपयांचं झोलगेन्स्मा इंजेक्शन देण्यात आलं होतं. वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. इतक्या प्रयत्नानंतरही वेदिकाची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आहे. वेदिकावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही केलं होतं. वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर अमोल कोल्हे यांनी एक ट्वीटही केलं होतं. वेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं! आपल्या भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे. तिला 'स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १' हा दुर्मिळ आजार झाला. त्यानंतर या आजारावरील 'झोलगेन्स्मा' या १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी निधी उभारण्यासाठी संघर्ष सुरू झाला. आज ते १६ कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं याचं खरं तर मनाला समाधान वाटलं, असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं होतं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3llW260

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.