Type Here to Get Search Results !

'खेल रत्न'चे नामांतर: राष्ट्रवादीनं केलं मोदींची कोंडी करणारं ट्वीट

पुणे: क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या 'खेल रत्न' पुरस्काराचं नामांतर करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. यापुढं हा पुरस्कार राजीव गांधी यांच्याऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावानं दिला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसनं तीव्र नाराजी दर्शवली आहे. इतर पक्षांनीही वेगवेगळ्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरलं आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय जनतेच्या मागणीचा विचार करून घेतला गेला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदींना बोचरा टोला हाणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सरकारच्या या निर्णयावर ट्वीट केलं आहे. वाचा: 'जनतेची मागणी' असल्यामुळं खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं आहे, असं मोदी म्हणतात. चांगलं आहे. पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा... युवकांना रोजगार द्या... महिलांना सुरक्षा द्या... शेतकऱ्यांना सन्मान द्या... राजीनामा द्या... या देखील जनतेच्या मागण्या आहेत. त्यावर मोदी सरकार कधी निर्णय घेणार?,' असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, त्यासाठी सरकार देत असलेली कारण अनेकांना पटलेली नाहीत. गांधी-नेहरू या नावाच्या तिरस्कारातून मोदी सरकारनं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. खेल रत्न पुरस्काराला राजीव गांधी यांचं नाव चालत नसेल तर अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव का? त्या स्टेडियमला एखाद्या महान क्रिकेटपटूचं नाव का नाही? मोदींचं क्रीडा क्षेत्रात काय योगदान आहे?,' असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X5SLxO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.