Type Here to Get Search Results !

अभ्यास करत नाही म्हणून आईने घेतला तीन वर्षांच्या लेकाचा जीव!

नाशिकः आई- मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. मुलगा ऑनलाइन अभ्यास करत नसल्याच्या रागात महिलेनं तीन वर्षीय करुन स्वतः आत्महत्या केली आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी साडे तीन वर्षीय मुलाचा खून करुन एका महिलेने आत्महत्या केली आहे. शिखा पाठक या महिलेनं साडे तीन वर्षीय रिधानची हत्या करत गळफास घेत आत्महत्या केली आहे. घरात आई- वडिल बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करुन गळफास घेतला होता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असताना या प्रकरणाचा उलगडा झाला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाचाः सोमवारी घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी जवळच पोलिसांनी सुसाइड नोट सापडली होती. त्यात कोणालाही जबादार धरु नये, असं लिहलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली. यावेळी साडेतीन वर्षांचा मुलगा ऑनलाइन अभ्यास करत नसल्याचा राग शिखा यांना होता. त्या रागातूनच त्यांनी तीन वर्षांच्या रिधानची हत्या केली. रिधानच्या हत्येनंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. असे पोलिस तपासात समोर आले आहे. वाचाः नेमकं काय घडलं? पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन जवळ राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली असून पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आला होता. दरम्यान मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. प्रथमदर्शनी मुलाच्या तोंडावर उशी दाबून खून केला असावा व यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3s6hgGt

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.