Type Here to Get Search Results !

भाजप-मनसे युतीत 'हा' अडथळा; पाटील-राज भेटीवर फडणवीस बोलले...

मुंबई: महाराष्ट्रात येत्या काळात आणि या दोन पक्षांची नवी युती उदयास येईल अशी शक्यता बळावत चालली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मनसे अध्यक्ष यांची आजची भेट हे या युतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे. या अनुषंगाने विरोधी पक्षनेते यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ( ) चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची बहुप्रतीक्षित भेट अखेर आज घडली. पाटील यांनी थेट राज यांचं कृष्णकुंज निवासस्थान गाठत त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये या भेटीत विस्ताराने चर्चा झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी तपशील देताना, ही सदिच्छा भेट होती. भेटीत राजकीय चर्चा झाली पण युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला किंवा समोरून आलेला नाही. त्यामुळे तसे काही निष्कर्ष काढण्याचे कारण नाही. मूळात दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्व हा समान धागा असला तरी परप्रांतीयांबाबत मनसेची जी भूमिका आहे ती बदलत नाही तोपर्यंत पुढे सरकता येणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता तोच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज ठाकरे यांच्याशी युतीबाबत आज चर्चा झालेली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे याकडे सदिच्छा भेट म्हणूनच पाहायला हवं. महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावं, यावर बंधन नाही हे पण आपण लक्षात घ्या', असे फडणवीस यांनी सांगितले. मनसेसोबत युतीच्या शक्यतेवरही फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरेंचा पक्ष आणि भाजपात हिंदुत्व हा समान धागा असला तरी त्यांची परप्रांतीयांबद्दलची जी भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही. त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. आमच्यासाठी त्याचं निराकरण होणं आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. राजकारणात जर तरला काहीच स्थान नसतं. त्यामुळे पुढे काय होणार याचे आडाखे आताच बांधणे योग्य ठरणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. राजभेटीनंतर पाटील नेमकं काय म्हणाले? राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष परप्रांतीयांच्या विरोधात असल्याचं चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. त्यांची भूमिका जोवर व्यापक होत नाही तोवर आम्हालाही थोड्या मर्यादा राहतील. त्यांच्या मनात कुणाबद्दल कटुता नाही, हे माझ्या लक्षात आलं आहे पण म्हणून लगेचच दोन्ही पक्षांची युती होईल आणि निवडणुकीवर चर्चा होऊन जागावाटप वगैरे ठरेल असे नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. हिंदुत्व हा दोन्ही पक्षांत समान धागा असला तरी राज यांनी परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलल्याशिवाय युती शक्य नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न पाटील यांनी आजच्या भेटीत केल्याचेही स्पष्ट झाले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37trKpK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.