Type Here to Get Search Results !

केस सुकवत असताना तोल गेला अन् खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकली; पुण्यात तरुणीच्या सुटकेचा थरार

पुणेः खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. पुण्यातील शुकवार पेठेतील गणेश अपार्टमेंट ही घटना घडली आहे. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलीचे प्राण वाचवले आहेत. गच्चीवर केस सुकवत असताना मुलीचा पाय घसरला व ती खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकून पडली होती, अशी माहिती मुलीच्या आई-वडिलांनी दिली आहे. केस सुकवत असताना मुलीचा पाय घसरला आणि ती थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्रीलमध्ये अडकून पडली होती. त्यावेळी इमारतीतील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधला. वाचाः . घटना घडताच इमारतीतील लोकांनी अग्निशमन दलाच्या जावानांना पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळी, शिडी व रश्शीच्या सहाय्याने या मुलीची सुखरुप सुटका केली आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी या मुलीची सुखरुप सुटका केली आहे. या कामगिरीमधे अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, वाहनचालक राजू शेलार जवान राहूल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकूळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे सहभाग घेतला. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jSKOUz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.