Type Here to Get Search Results !

'जनता हवालदिल असताना मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटण्यात मग्न'

जळगाव: ' सरकार मधील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत राज्याचे नुकसान करत आहेत. शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असून गेल्या दोन वर्षांत राज्यात कुठलीही ठोस कामे झालेली नाहीत. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती तर काही ठिकाणी दुष्काळाचे सावट असल्याने जनता हवालदिल झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री हे टीव्हीवर भूलथापा मारून स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात मशगूल आहेत', अशा शब्दात नेते, आमदार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ( ) वाचा: जळगाव जिल्हा भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी दुष्काळ, भाजपातील नेतृत्व बदलाची चर्चा, करोना लसीकरण व लॉकडाऊन संदर्भात आपली मते मांडली. गिरीश महाजन म्हणाले, 'जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना भाजप सरकारच्या काळात परवानगी मिळाली होती. ती कामे सुरू देखील झाली होती. मात्र अनेक धरण प्रकल्पांची सुरू असलेली कामे या सरकारने बंद पाडली. ९० टक्के काम झालेल्या वाघूर धरणासाठी सध्याच्या सरकारने रुपयाचा सुद्धा निधी न दिल्याने ४५ हजार एकर शेती सिंचनापासून वंचित राहिली आहे. राज्यातील अपूर्ण प्रकल्पांची अशीच अवस्था आहे. जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागात पैसाच नसल्याने कुठलीही कामे झाली नाहीत. त्यामुळे हा विभाग अस्तित्वात आहे की नाही? अशी अवस्था झाली असल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला. हे महाविकास आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे. आतापर्यंतचं सर्वात अपयशी सरकार राज्याला मिळालं असून भूलथापा मारण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. लोकप्रिय म्हणवून घेणारे मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटवून घेण्यात धन्यता मानत आहेत. वाचा: खान्देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; कृत्रीम पावसाची आवश्यकता खान्देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जमिनीत ओल आलेली नाही. धरणे अद्याप कोरडी आहेत. दुष्काळ सदृश्य भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्य सरकारच्या मंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र देणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. दिल्लीत मंत्र्यांच्या गाठीभेटी; नेतृत्व बदलाचा विषय नाही केंद्र सरकारमध्ये राज्यातील अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळाले. त्यांना भेटण्यासाठी राज्यातील नेते दिल्ली येथे गेले होते. मंत्र्यांच्या गाठीभेटी घेवून राज्यातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा अन्य नेतृत्व बदलाचा कुठलाही विषय नव्हता. या केवळ अफवा असल्याचेही ते म्हणाले. तसेच भाजपाने आपणास कुवतीपेक्षा जास्त दिले आहे. मी समाधानी आहे. त्यामुळे मला दूर करणे स्थानिक नेतृत्वात बदल करणे असे काही नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील काही महिन्यांत इतर ठिकाणच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्यामुळे जळगाव जिल्ह्यात जास्त वेळ देता आला नाही. जळगाव महापालिकेत झालेल्या सत्तांतराची कल्पना नव्हती. आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिल्याची कबुली देखील गिरीश महाजन यांनी यावेळी दिली. वाचा: कार्यक्रम घेताय मग मंदीर बंद का? राज्यातील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष रॅली काढत आहेत. गर्दी जमवत आहेत. तिथे करोना पसरत नाही मग मंदिरं बंद का ठेवलीत? मंदिरांमधूनच करोना पसरतो का? असा सवाल महाजन यांनी केला. लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने राज्याना लशींचा साठा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, स्वत:ची जबाबदारी पार न पाडता राज्य सरकार केंद्र शासनावर आरोप करत आहे, अशी टीकाही महाजन यांनी केली. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण प्रश्न निर्माण होण्यास देखील राज्य सरकार जबाबदार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही, महात्मा गांधी यांच्या तिन्ही माकडांप्रमाणे यांची अवस्था झाली असल्याचा आरोप महाजन यांनी केला. कोकण, सातारा, कोल्हापूर येथील पूर परिस्थिती हातळताना राज्य सरकारने असंवेदनशीलता दाखविल्याचेही ते म्हणाले. मुंबई महापालिका भाजप स्वबळावर लढणार भाजप स्वबळावर व पूर्ण ताकदीनीशी लढणार आहे. त्यात मनसेची मिळाली तर मदत घेतली जाईल, असे सांगताना यावेळी मुबंई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CGdhWf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.