Type Here to Get Search Results !

ट्विटरचा कारवाईचा सपाटा! महाराष्ट्रातील 'या' नेत्याचं अकाऊंटही ब्लॉक

मुंबई: काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्षाचं अधिकृत अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर आता ट्विटरनं राज्यातील काँग्रेस नेते व महसूलमंत्री यांचंही ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ( Block) ते पत्रकारांशी बोलत होते. 'ट्विटर हे समाजमाध्यम आहे. त्यावर प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतो. लोकशाहीत मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य असतं. फक्त ते देशाच्या विरोधात नसावं ही अपेक्षा असते. पण जे समाजाच्या हिताचं असतं, ते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. राज्यघटनेनंच तो अधिकार दिलेला आहे. आम्ही त्याचा वापर करत होतो. राहुल गांधी देखील तेच करत होते. पण आज काँग्रेस पक्षाचं अधिकृत अकाउंट ब्लॉक केलं गेलं. राहुल गांधी यांचं केलं गेलं. राहुल गांधी यांच्या समर्थन केल्याच्या कारणावरून माझंही हँडल ब्लॉक करण्यात आलं आहे,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले. वाचा: 'खरं तर ट्विटर ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मान्यताप्राप्त संस्था आहे. अशा संस्थेनं एखाद्या पक्षाच्या, म्हणजेच भाजपच्या किंवा सत्तेच्या दबावाखाली येणं हे त्यांना शोभणारं नाही. भारतात विचार स्वातंत्र्याची गळचेपी कशी सुरू आहे हे दाखवून देणारं हे उदाहरण आहे. ट्विटर त्यासाठी कारणीभूत आहेच, पण त्यापेक्षाही अधिक जबाबदार भाजप आणि केंद्र सरकार आहे,' असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. दिल्लीतील एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी अलीकडंच राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल यांनी त्या भेटीचे फोटो ट्विट केले होते. बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याबद्दल त्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ट्विटरनं त्यांचं अकाउंट सस्पेंड करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं अधिकृत अकाऊंटही ब्लॉक करण्यात आलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iFwKhD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.