Type Here to Get Search Results !

'... तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली'

मुंबई: ''ची निर्मिती करणारी इस्त्रायली कंपनी 'एनएसओ' सोबत कोणताही व्यवहार झालेला नाही असे संरक्षण मंत्रालय सांगत असेल तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली. ही घटना अधिक गंभीर असून याच्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ चौकशी समिती नेमावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून लोकांचे मोबाइल फोन हॅक केल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सलग पंधरा दिवसांपासून ठप्प केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तर दिलं आहे. पेगॅसस स्पायवेअर तयार करणारी इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुप टेक्नॉलॉजीजशी संरक्षण मंत्रालयाचा काहीही संबंध नसल्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत सोमवारी म्हटलं आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. वाचाः संरक्षण मंत्रालय 'एनएसओ'सोबत व्यवहार केला नसल्याचे सांगत आहे. मात्र केंद्रसरकारने संसदेत येऊन सरकारच्या कुठल्याही एजन्सीने पेगॅसससोबत व्यवहार केलेला नाही किंवा सेवा घेतलेली नाही हे स्पष्ट सांगावे. समजा केंद्रसरकारने कोणतीही सेवा घेतलेली नाही हे खरे असेल तर केंद्रसरकारने संसदेत येऊन स्पष्ट करावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. तसंच, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी सांगत असतील तर तो केंद्र सरकारचा खुलासा होत नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. वाचाः सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, वकील, पत्रकार, विरोधी पक्षनेते यांचे फोन टॅप केले जातात आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय व्यवहार केला नाही असे सांगत असेल तर ही घटना गंभीर आहे. केंद्र सरकारने पुढे येऊन यावर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xyot3m

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.