Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवडमध्ये सापडला बॉम्ब, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. इथे शहरांमध्ये बॉक्स सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना इथं बॉम्ब आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेऊन तो बॉम्बनाशक पथकाकडे सोपवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बॉम्ब जिवंत आहे की नाही याबाबत बॉम्बनाशक पथकाचा शोध सुरू आहे. नेमका बॉम्ब कधीचा आहे ? जिवंत आहे की नाही ? याबाबत शोध सुरू असून यासंबंधीची अधिक माहिती काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण दरम्यान या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VFgYuv

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.