Type Here to Get Search Results !

youth beaten to death by police: पोलिसांच्या मारहाणीत युवक ठार; संतप्त जमावाची पोलिस ठाण्यावर दगडफेक

दारव्हा: दारव्हा येथील पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या मारहाणीत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरातील संतप्त जमावाने पोलिस स्टेशनवर गोटमार केली. ही घटना मंगळवार दिनांक सहा जुलैला रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे. ( by police and at police station) याबाबत सविस्तर वृत्त असे की, सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान दारव्हा शहर पोलिसांनी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील युवकांना पकडून आणले त्यांना नेमकी कुठल्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडले याबाबत मात्र नेमकी माहिती मिळू शकली नाही. या युवकांना पोलिसांनी पकडून आणल्यानंतर तीनही युवकांना जबर मारहाण केल्याने यातील शेख इरफान शेख शब्बीर वय (वर्ष 27) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटनास्थळावर बोलले जात होते. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांच्या मारहाणीत या झाल्याने संतप्त जमावाने येथील पोलिस स्टेशनवर दगडफेक केली असून शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्‍त कुमक बोलवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hmSWw8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.