Type Here to Get Search Results !

महापालिकेचा मोठा निर्णय; 'या' प्रवाशांना मुंबईत RTPCR चाचणीशिवाय मिळणार प्रवेश

मुंबई: राज्य सरकारने मुबई विमानतळावर उतरणाऱ्या सर्व डोमेस्टिक प्रवाशांसाठी करोना काळात असलेल्या नियमांमध्ये काही अंशी शिथिलता आणली आहे. हा बदल दोन्ही करोना प्रतिबंधक लशी घेतलेल्यांसाठी करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या प्रवाशांनी लशींचे दोन्ही डोस घेतले असतील अशांना आता विमानतळावर दाखवण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत बाहेरून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या ४८ तास आधीचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असणे बंधनकारक करण्यात आले होते. यातून आता लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना वगळण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय जाहीर केला आहे. (Passengers who have taken both doses of vaccine will get admission in Mumbai without RTPCR report) करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे. सुरुवातीच्या काळात हा नियम गुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थान आणि केरळमधून येणाऱ्या लोकांसाठीच करण्यात आला होता. माक्र करोनाचा प्रादूर्भाव जसा वाढत गेला, तसा हा नियम सरसकट सर्वच प्रवाशांना लागू करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- राज्यसह देशभरात लसीकरणावर विशेष भर देण्यात आला असून प्रत्येक राज्य जलदगतीने अधिकाधिक लसीकरण कसे होईल यावर भर देत आहेत. दरम्यानच्या काळात अनेक नागरिकांना आपले लशीचे दोन डोस घेतलेले आहेत. ज्या नागरिकांनी करोना प्रतिबंधस लशींचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशांना दुसऱ्या राज्यात प्रवेश करताना ४८ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट दाखवण्यापासून सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. क्लिक करा आणि वाचा- अनेक लोक मुंबईतून दिल्लीला प्रवास करतात आणि त्याच दिवशी परत देखील येतात. अशांना पुन्हा करणे शक्य नसते. हा नियम शिथिल करताना ही बाब देखील विचारात घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UEGoYi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.