नागपूर: चिकन आणण्यावरून भावांमध्ये वाद झाला. यात लहान भावाने मोठ्या केला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सोनेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत घडली. सचिन भगवान चिंचोळकर (वय ३५ रा. सीतानगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर मोठा भाऊ नितीनवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ( as he opposed to eating chicken in ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन व भाऊ नितीन भगवान चिंचोळकर (४०) एकत्रच राहतात. नितीन धार्मिक प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे तो सण वार, तिथी आदी मानतो. गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सचिनने चिकन आणले. गुरुवार असल्याने नितीन नाराज झाला. त्यांनी सचिनला फटकारले. यावरू दोघांत बाचाबाची सुरू केली. त्यामुळे नाराज होऊन नितीनने सचिनच्या कानशिलात वाजवली. सचिनचा राग अनावर झाला. त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने नितीनच्या डोक्यावर, हात व पायांवर वार केले. क्लिक करा आणि वाचा- या घटनेत नितीन गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी सचिनविरुध्द गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kKBJiy