सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ७ हजार ६७१ कुटुंबातील ३६ हजार ९८७ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठी अशा एकूण १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. (in kolhapur ,000 people from 7,671 families have been shifted due to the floods) जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित ६, अंशत: बाधित ८० अशी एकूण ८६ गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रात अंशत: १ गाव बाधित आहे. मिरज ग्रामीण मध्ये २ गावे पूर्णत: तर २ गावे अंशत: अशी ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये १५ गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा येथील २ गावे पूर्णत:, २७ गावे अंशत: अशी एकूण २९ गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील १ गाव पूर्णत:, ३ गावे अंशत: अशी एकूण ४ गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील अंशत: १३ गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील १ गाव पूर्णत:, १९ गावे अंशत: अशी एकूण २० गावे बाधित आहेत. क्लिक करा आणि वाचा- स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील २३४ कुटुंबामधील १ हजार ६ व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीण मधील १ हजार ४२४ कुटुंबातील ५ हजार ७४९ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील २ हजार ४५२ कुटुंबातील १४ हजार ७२५ व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील ४२४ कुटुंबातील २ हजार १३५ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील ३९४ कुटुंबातील १ हजार ८४२ व्यक्तींचे , पलूस तालुक्यातील २ हजार ४३६ कुटुंबातील ९ हजार ३२३ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील मिरज ग्रामीण क्षेत्रातील १ हजार २१९, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ७४६, वाळवा क्षेत्रातील ३ हजार २६२, अपर आष्टा क्षेत्रातील १ हजार ९०, शिराळा तालुक्यातील २ हजार २२८, पलूस तालुक्यातील ५ हजार २५५ जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील ५ व पलूस तालुक्यातील ३ अशा एकूण ८ जनावरांची जीवितहानी झाली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hYviGB