Type Here to Get Search Results !

निलेश राणे यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, तब्बल ९० कुटुंबांना घरी जाऊन दिले...

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अशात चिपळूण खेर्डी येथील सती समर्थनगर येथील सुमारे 80 ते 90 पूरग्रस्त कुटुंबांना माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी चटई, ब्लँकेट आणि जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. यावेळी पूरग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड, पोलीस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांच्याकडून भाजप नेते निलेश राणे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना मदत केली. रत्नागिरीमध्ये नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये २२ जुलैपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरण कंपनीच्या वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. सतत वाढणाऱ्या पाण्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून काही मुख्य वीजवाहिन्या बंद करणे अत्यावश्यक ठरले आहे. परंतु जसे जसे पाणी ओसरेल आणि वीज वाहिन्या पाण्यात नाहीत याची खात्री केल्यानंतरच वीजवहिनी सुरू करता येते. त्यामुळे तब्बल १०० गावांना आणखी किती काळ अंधारात राहावे लागेल हे अनिश्चित आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ७६१ गावे पूर परिस्थिती मध्ये बाधित झाली आहेत. यापैकी ६६४ गावातील विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. परंतु अद्यापि ९७ गावातील वीज पुरवठा पूरस्थिती मुळे बाधित आहे. जिल्यातील एकूण ०७ उपकेंद्रे बाधित झाली होती पैकी ओझर उपकेंद्रे सुरू करण्यात आली. ६ उपकेंद्रे अद्याप बंद आहेत. याअंतर्गत उपकेंद्र अंतर्गत येणारे ४,६०९ ट्रान्सफॉर्मर बंद पडले होते. त्यापैकी ३६६२ सुरू झाले आहेत. उर्वरित ९४७ ट्रान्सफॉर्मर पूरस्थिती नियंत्रणात आल्यावर लगेचच सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V2aRQd

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.