मुंबई: राज्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचे बळी गेले, तर महापुराची स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. या परिस्थितीनंतर राजकीय नेत्यांचे दुर्घटनाग्रस्त आणि पूरग्रस्त भागांमध्ये दौरे सुरू झाले आणि मदतीसाठी प्रयत्न होऊ लागले. तर दुसरीकडे या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्धही सुरू झाले. शिवसेना नेते, खासदार यांनी या विषयावरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली. त्यावर प्रत्युत्तर देत भाजप नेत्या यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. (bjp leader chitra wagh criticizes shiv sena mp sanjay raut on flood situation in konkan) चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट करत खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ही टीका करत असताना संजय राऊत यांना सर्वज्ञानी असा उल्लेख करत टोला लगावला आहे. सर्वज्ञानी संजय राऊत यांनी त्यांच्या रोजच्या प्रात:कालीन सवयीप्रमाणे आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक आणि केंद्र सरकारवर दोषारोप करून ते मोकळे झाले. खरे तर प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेच्या वेळेला तत्परतेने मदत केली असती, तर खूप लोकांचे जीव वाचले असते, असे वाघ म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- प्रशासनावर टीका करताना वाघ म्हणाल्या, 'दुर्घटनास्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन पोहोचले. वृत्त वाहिन्या देखील पोहोचल्या. गावकऱ्यांनी ३९ जणांचे मृतदेह बाहेर काढले. प्रशासन मात्र तिथे तब्बल १६ तासांनी अवतरले.' 'सरकारचे प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणाला प्राधान्य' प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणाला प्राधान्य दिल्यानंतर होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला पडतात आणि सरकार पंगू होण्यात त्याचं पर्यवसन होते, असे सांगत वाघ यांनी ठाकरे सरकारवर आरोप केला. ठाकरे सरकारचा मागचा दोन वर्षांचा कार्यकाल पाहिला, तर विविध दुर्घटनांमध्ये सरकारच्या निष्क्रियतेमुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, असे सांगतानाच असे झाल्यानंतर देखील बदल्यांच्या अर्थकारणाला प्राधान्य देणे म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. क्लिक करा आणि वाचा- 'राणे यांच्याबद्दलची तुमची पोटदुखी कोकणच्या जनतेला ठावूक आहे' वाघ पुढे म्हणाल्या, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रातर्फे पुरग्रस्त भागात दौरा केला. मात्र, अशा संकटात सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून अधिकारी गैरहजर राहिले, असा सवाल वाघ यांनी केला. नारायण राणे यांच्याबद्दल असलेली तुमची पोटदुखी किमान या संकटाच्या काळात तरी बाजूला ठेवून या चांगल्या हेतूला मदत कराल अशी अपेक्षा होती. मात्र आपण नेहमी प्रमाणे राजकीय हेकेखोरीचे प्रदर्शन केले. मात्र, फौजफाटा, दर्शनसोहळा कोणी केला याचे उत्तर आपल्या कर्तृत्वामुळे कोकणातील जनतेला कळणारच आहे, असे वाघ म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/373ENOF