ठाणे: अध्यक्ष यांनी आज ठाणे येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आपल्या खास शैलीत त्यांनी उत्तर दिलं. ( ) वाचा: राज ठाकरे यांनी पक्षसंघटन भक्कम करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवत त्यांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. नाशिक, पुणे, ठाणे या शहरांवर पहिल्या टप्प्यात त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. नाशिक आणि पुणे येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज यांनी आज ठाण्यातील मनसैनिकांशी संवाद साधला. त्याआधी ते माध्यमांशी बोलले. यावेळी राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाबाबत विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. तुम्ही काय सांगाल, असे एका पत्रकाराने विचारले असता 'मुख्यमंत्र्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची तू काळजी करू नको' असे उत्तर राज यांनी दिले. वाचा: दरम्यान, राज्यावर कोसळलेलं महापुराचं संकट आणि अजूनही कायम असलेला करोनाचा धोका या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आधीच जाहीर केलेला आहे. त्यामुळे वाढदिवसाचा अधिकृत कोणताही कार्यक्रम नसला तरी मुख्यमंत्र्यांना विविध माध्यमांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. पंतप्रधान यांनी आज सकाळीच ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे. शिवसेना नेते यांचं ट्वीटही यात चर्चेत आहे. 'अखंड साथ. अतुट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!', असे ट्वीट करत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्याची भरभरून स्तुती केली आहे. शुभेच्छांच्या या वर्षावात राज यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यात की नाहीत याची उत्सुकता माध्यमांना होती. राज यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर असं ट्वीटही दिसलं नाही. त्यामुळेच माध्यमांनी त्यांना याबाबत विचारणा केली मग त्यावर राज यांचंही समर्पक उत्तर आलं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात हेही स्पष्ट झालं. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rAs9jw