Type Here to Get Search Results !

नागपूर पोलिसांची मुंबईजवळ मोठी कारवाई; ड्रग्स तस्कराला ठोकल्या बेड्या

: गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पालघरमध्ये सिनेस्टाइल कारवाई करून नायजेरियन तस्कराला बेड्या ठोकल्या. मुंबईजवळ नागपूर पोलिसांनी एमडी तस्करी प्रकरणात केलेली अलिकडच्या काळातील ही पहिलीच कारवाई आहे. अ‍ॅन्थोनी ओग्बोन्ना इव्होके असं अटकेतील एमडी तस्कराचं नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५ जुलैला दाभा नाका परिसरात सापळा रचून अंकित राजकुमार गुप्ता, ऋतिक रितेश गुप्ता व ऋषभ प्रभाकर सोनकुसरे या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीची एमडी जप्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिघांची पोलिस कोठडी घेतली. मुंबईतील मामू ऊर्फ मेहंदी हाश्मी नजमुल सय्यद याने ही एमडी दिल्याचे तिघांनी पोलिसांना सांगितले. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक विशाल काळे, उपनिरीक्षक बलराम झाडोकार, हेडकॉन्स्टेबल प्रदीप पवार, राजेश देशमुख, नितीन मिश्रा यांनी मुंबई गाठून मेहंदी हाश्मी नजमुल सय्यद अर्थात मामू याला अटक केली. दरम्यान, मामूची पोलिस कोठडी घेण्यात आली. पालघर येथील नायजेरियन अ‍ॅन्थोनी याने एमडीचा पुरवठा केला असून तो बडा तस्कर असल्याचे मामूने पोलिसांना सांगितले. त्यानंतर राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने पालघर गाठले. सिनेस्टाइल सापळा रचून अॅन्थोनी याला अटक केली. त्याला नागपुरात आणण्यात आलं आहे. पोलिसांनी अ‍ॅन्थोनी याची १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UbA4Yn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.