Type Here to Get Search Results !

anil gote criticizes fadnavis: माजी आमदार अनिल गोटे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'या' भाषेत टीका

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार यांनी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत, अशा शब्दांत गोटे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (former mla criticizes ) 'मास लिडर संपविण्याचे काम फडणवीसांनी केले' देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करताना गोटे म्हणाले की, जनतेचा पाठिंबा असलेले अर्थात मास लीडर संपविण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही मास लीडर नाहीत. त्यांच्या बोलण्याने सत्य लपत नाही, असे सांगतानाच भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचेही गोटे यांनी म्हटले आहे. या बरोबरच, झोटिंग समितीच्या अहवालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे काही एक नुकसान होणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- गोटेंनी आघाडीच्या नेत्यांना दिला घरचा अहेर अनिल गोटे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा अहेर दिला आहे. सत्ताचूर झाल्यानंतर आपल्याला कोण किती किंमत देतो?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आघाडीतील पक्षांना देखील सुनावले आहे. आघाडीत सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्ये करत आहेत. आघाडीचे तिन्ही पक्ष स्वखुशीने एकत्र आले आहेत. कोणी कोणाला बळजबरी केलेली नाही. जी जबाबदारी स्वेच्छेने स्विकारली आहे, ती आपली जबाबदारीमआनंदाने पार पाडली पाहिजे, असा टोलाही गोटे यांनी आघाडीतील घटक पक्षांना लगावला आहे. क्लिक करा आणि वाचा- सन १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुलोदचे सरकार आले होते. त्या सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते आणि शरद पवारांचा एस. काँग्रेस असे सगळे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावेळी देखील वाद होत होते, मात्र त्याच्या वेड्यावाकड्या बातम्या वर्तमानपत्रांत आल्या नाहीत, याकडे गोटे यांनी लक्ष वेधले आहे. क्लिक करा आणि वाचा- ‘अनेक नेते प्रसारमामाध्यमांना पुरवितात खाद्य’ महाविकास आघाडीतील अनेक नेते प्रसारमाध्यमांना स्वतःहून खाद्य पुरववत असून हे शोभणारे नसल्याचे गोटे यांनी म्हटले आहे. आपले हसू होत आहे, हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी दाखवणे आवश्यक आहे, असे सांगत हा वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वीकारली असल्याचे गोटे यांनी जाहीर केले. आपला पक्ष सत्तेत असताना आपण जे काही बोलतो त्याला प्रसिध्दी माध्यमामध्ये किती किंमत आहे?, सत्ता गेल्यावर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनी मागील पाच वर्षात अनुभवले आहे, असे सांगतानाच आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या गोष्टीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा वर्तवणुकीला भिकेचे डोहाळे लागले असेच म्हणावे लागेल, अशा शब्दात गोटे यांनी सुनावले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UNW8s9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.