Type Here to Get Search Results !

'छत्रपतींची गादी ही पदापेक्षा मोठी; संभाजीराजेंनी राजीनामा द्यावा'

सोलापूर : () रद्द करण्यात आल्यानंतर खासदार () हे गेल्या काही दिवसांपासून राज्यभर फिरुन लोकांशी संवाद साधत आहेत. तसंच मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसदर्भात त्यांनी राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपलं नेतृत्व प्रस्थापित करू पाहात आहेत का, अशी चर्चाही सुरू झाली. अशातच कन्नडचे माजी आमदार यांनी संभाजीराजेंना थेट पदाचा राजीनामा आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणप्रश्नी हर्षवर्धन जाधव यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पक्ष सोडून समाजासाठी लढा देण्याचं आवाहन केलं आहे. ते आज सोलापूरात बोलत होते. मराठा आरक्षणाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी हर्षवर्धन जाधव हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने हर्षवर्धन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी छत्रपती संभाजीराजे यांनी आधी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी असं आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणावरुन भाजपवर हल्लाबोल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत. 'भाजपने मराठा समाजाला दोन वेळा आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवलं आहे. आजही भाजप मराठा समाजाला फसवत आहे. त्यामुळे अराजकीय अजेंडा घ्यायचा असेल तर छत्रपती संभाजीराजे यांना भाजपच्या पक्षीय संवैधानिक पदाचा त्याग करावा लागेल, तरंच समाजाच्या आंदोलनाला धार येईल,' असं जाधव म्हणाले. दरम्यान, छत्रपतींची गादी ही इतर कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. त्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा आधी दिला तर समाज त्यांच्यासोबत जाईल, आम्हीही जाऊ,' असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ka5rgp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.