Type Here to Get Search Results !

devendra fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; कोर्टाने 'ती' याचिका फेटाळली

नागपूर: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याविरुद्ध यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. (The court rejected the petition against ) अनेक वर्षांपूर्वी सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत दाखल एका गुन्हयात काहीही निष्पन्न झाले नाही. पण, त्या गुन्हयात देवेंद्र फडणवीस आरोपी असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. उके यांच्यानुसार फडणवीस हे याचिकेत प्रतिवादी नव्हते. त्यामुळे याचिकेची प्रत केवळ सरकारी वकील व पोलिसांकडे उपलब्ध होती. पण, फडणवीस यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला असून त्यांनी याचिकेचे दस्तावेज चोरीने मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. याकरिता त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी तक्रारीवर कोणतीच कारवाई न केल्याने उके यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. कोर्टरुममध्ये न्यायालयाने हा अर्ज फेटाळत असल्याचे सांगितले. मात्र, संध्याकाळी न्यायालयाच्या संकेतस्थळावर हे प्रकरणी २० जुलै रोजी ठेवण्यात आल्याचे दाखविण्यात येत होते. त्यामुळे याबाबत काहीसा संभ्रम कायम होता. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yUQvqV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.