Type Here to Get Search Results !

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात १५ टक्के पाणी कपात

मुंबईः गेल्या महिन्याभरापासून मुंबईत बरसलेल्या पावसानं तलावांच्या पाणी साठ्यात वाढ झाली. असं असतानाही मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात ही कपात पाण्याच्या कमीमुळं नाही तर पालिकेनं काढलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीमुळं आहे. त्यामुळं पाणी जपून वापरा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी मुंबईतल्या काही भागात १५ टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. मंगळवारी मुंबईच्या काही भागात वितरीत करणाऱ्या पाईपलाइनच्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांना १४ तास पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. या भागात सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल, अशी माहिती पालिकेनं दिली आहे. वाचाः ३ ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात होणार आहे. कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि गोरेगावमधील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. के पूर्व आणि पी दक्षिण विभागातील काही परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसंच, मुंबई शहर भागातील एफ उत्तर, एफ दक्षिण हे दोन विभाग वगळता व पश्चिम उपनगरांमधील सर्व विभागांमध्ये १५ टक्के कपातीसह पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून योग्य तितकेच पाणी वापरावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाचाः वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lgjCRS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.