Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे बैठकीला तब्बल सात तास उशिरा पोहचले आणि...

जळगाव: राज्य व महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने नगरविकास मंत्री शहरासाठी मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत कोणतीही ठोस घोषणा केली नाही. जळगावच्या विविध प्रश्नांवर आश्वासनापलीकडे शिंदे यांनी काहीच दिले नाही. ( ) वाचा: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्री , महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदींसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. वाचा: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव शहराच्या विविध प्रश्नांसह मनपातील प्रलंबित निधी व योजनांची यादी नगरविकास मंत्र्यांसमोर सादर केली. यामध्ये शासनाने स्थगित ठेवलेल्या ४२ कोटींच्या निधीवरील स्थगिती उठविण्यात यावी. हुडको कर्जापोटी राज्यशासनाने भरलेल्या रकमेचे कर्ज फेडण्यात यावे, गाळे प्रश्न, आकृतीबंधासह मेहरूण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानाचा विकासासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच नगरपालिकांमधील अभियंत्यांचा रिक्त जागा भरण्याचीही मागणी केली. पालकमंत्र्यांनी केलेल्या मागणीनंतर नगरविकास मंत्र्यांनी मनपा प्रशासनाला विविध प्रलंबित विषयांबाबत सूची तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ही यादी घेवून मुंबईत नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेवून जे विषय तत्काळ मार्गी लावता येतील असे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. लोकसहभागातून कामे करण्याचा सल्ला नगरविकासमंत्र्यांनी आढावा बैठकीत कोणत्याही नवीन निधीची घोषणा न करता, प्रशासनाला आपल्या उत्पन्नांचा स्त्रोत वाढविण्याचा सूचना दिल्या. जळगाव शहरात देखील ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबवली मनपाप्रमाणेच लोकसहभागातून कामे करण्यावर भर द्या, अशा सूचना नगरविकासमंत्र्यांनी या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांना दिल्यात. मात्र जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने कुठलीही ठोस घोषणा न करता मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक आटोपती घेतली. नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक दुपारी १२.३० वाजता घेण्यात येणार होती. मात्र, एकनाथ शिंदे मुंबईहूनच उशिराने निघाल्यामुळे त्यांच्या नियोजित कार्यक्रमांत बदल झाला. तसेच महापालिकेतील नियोजित बैठक सोडून, नगरविकास मंत्री येथील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रवाना झाल्यामुळे महापालिकेतील बैठक तब्बल सात उशिराने सायंकाळी ७.३० वाजता सुरू झाली. यामुळे मनपा अधिकारी, शिवसेना पदाधिकारी दिवसभर महापालिकेतच ताटकळले होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hT3FOg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.