Type Here to Get Search Results !

'राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं 'त्या' दोन्ही बैलांना आवडलं नसेल!'

नागपूर: ' यांना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांना आवडलं नसेल आणि त्यामुळेच तुटली असेल', असा टोला विरोधी पक्षनेते यांनी मुंबई काँग्रेसच्या मोर्चात घडलेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने लगावला आहे. ( ) वाचा: पेट्रोल आणि डिझेल दरवाढ या मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून सध्या राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलगाडी तुटून जगताप तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते खाली कोसळले. या दुर्घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून भाजप नेत्यांकडून यावर तीरकस प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. वाचा: नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. मी तो व्हिडिओ पाहिला. 'देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो', अशा प्रकारच्या घोषणा जगताप आणि बाकी कार्यकर्ते तिथे देत होते. बहुतेक राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलं नसावं आणि त्यामुळेच ही बैलगाडी तुटून सगळेजण खाली कोसळले असावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. माझ्याकडून काँग्रेसच्या या आंदोलनाला शुभेच्छाच आहेत, असेही फडणवीस म्हणाले. वाचा: सट्टावालाही एखाद्या मंत्र्याची पूजा करेल! चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आल्यानंतर तेथील एका बारमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची आरती करण्यात आली. त्याकडे लक्ष वेधले असता, या सरकारच्या काळात अशाच प्रकारच्या पूजा पाहायला मिळू शकतात. उद्या एखाद्या सट्टेवाल्याने एखाद्या मंत्र्याची पूजा केली तरी आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. या सरकारकडून दुसरी काही अपेक्षा नाही, अशी उपरोधीक टीका फडणवीस यांनी केली. स्वप्नील लोणकर आत्महत्येवरूनही फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. एमपीएससीच्या मुद्द्यावर हे सरकार गंभीर नाही. स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतरही सरकारला जाग आलेली नाही. केवळ आश्वासने दिली जात आहेत. अजून त्यांच्या कुटुंबीयांना मदत दिली गेलेली नाही. एमपीएससीच्या उमेदवारांना दिलासा देणारा कोणताच निर्णय सरकार घेत नाहीय, अशा शब्दांत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e2wRRA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.