Type Here to Get Search Results !

भारती पवारांचं भाषण सुरू असताना प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंना हसू अनावर?; जुना व्हिडिओ व्हायरल

मुंबईः भाजपच्या दिंडोरीच्या खासदार डॉ. () यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भारती पवार यांना राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नव्याने संधी देण्यात आलेल्या खासदारांमध्ये डॉ. भारती पवार यांचा समावेश आहे. पवार यांनीही बुधवारी मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारती पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर २०१९मधील एक व्हिडिओ व्हायरल आहेत. या व्हिडिओत भारती पवार लोकसभेत भाषण करत असताना खासदार प्रीतम मुंडे व यांना हसू आवरत नसल्याचं दिसत आहे. मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या भारती पवारांच्या मंत्रिपदाची लॉटरी लागल्यानं हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप १६ जुलै २०१९ची आहे. दरम्यान, २०१९मध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु होत्या. या चर्चेवर खासदार रक्षा खडसेंनी आमच्या हसण्याचा भारती पवारांच्या भाषणाशी काहीही संबंध नव्हता, असा खुलासा केला होता. संसदेत हास्यविनोद होतच असतात. तो विषय गंभीरपणे घेण्याऐवजी माध्यमांनी चांगल्या कामांना प्रसिद्धी द्यावी, असंही रक्षा खडसेंनी म्हटलं होतं. रक्षा खडसेंनी या बाबत पूर्वी खुलासा केला असला तरीदेखील हा व्हिडिओ सध्या पुन्हा व्हायरल होत आहे. पाहा जुना व्हिडिओ कोण आहेत भारती पवार? डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी मतदारसंघातून २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली, तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्या दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. डॉ. पवार जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार ठरल्या होत्या. आता त्यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले. मोदी मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. डॉ. पवार यापूर्वी जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. कुपोषण व आरोग्य हे खासदार डॉ. पवार यांचे जिव्हाळ्याचे विषय असून, जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून सभागृहात काम करताना जिल्ह्यातील कुपोषणावर त्यांनी काम केले. नाशिकला केंद्रात प्रथमच थेट मंत्रिपद मिळाल्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. पवार उच्चशिक्षित असून, त्या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत. त्यांचे दीर नितीन पवार राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांच्या निवडीनंतर नाशिकमधील त्यांच्या निवासस्थानासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जल्लोष करण्यात आला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hPMRHU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.