Type Here to Get Search Results !

'सरकारने माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा एका आईचा आरोप आमचा नाही'

मुंबई : 'सरकारने माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा एका आईचा आरोप आहे आमचा नाही' अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. याच मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अधिवेशनात बोलताना प्रविण दरेकर यांनीही राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. यावेळी बोलताना प्रविण दरेकरांनीही स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट वाचून दाखवली. सरकारने माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा एका आईचा आरोप आमचा नाही. लाखे विद्यार्थी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पण सरकारचं यावर लक्ष नाही, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. सरकारला दीड वर्ष यासाठी वेळ मिळाला नाही. यासंबंधी राज्य सरकारने सदस्य का नेमले नाही? असा सवालही यावेळी दरेकरांनी केला. दरम्यान, या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पण सरकारला याबद्दल गांभीर्य नाही. स्वप्निलने जे टोकाचं पाऊल उचललं त्यावर तातडीने विचार व्हायला हवा. अशा घटना होईपर्यंत सरकार आणि आयोग काय करतं असाही थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकंच नाहीतर विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे असं म्हणत एमपीएससी मुद्द्यांवर भाजपकडून स्थगन प्रस्थाव करण्यात आला आहे. अधिवेशनात फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच नाहीतर सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील स्वप्निलच्या आत्महत्या प्रकरणावर जोरदार टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांची मोठी घोषणा स्वप्निल लोणकरची आत्महत्या ही घटना वेदनादायी आहे. विरोधकांनी यावर अधिवेशनात मागणी केल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे एमपीएसीच्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36dJzZw

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.