Type Here to Get Search Results !

'टाळ्या, थाळ्यांची भंपकबाजी न करता मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली'

अहमदनगर: राज्याचे जलसंधारण मंत्री यांनी शिवसेनेच्या अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन ते सरकार आणि शिवसेनेचे काम लोकांना सांगत आहेत. कोपरगाव येथील मेळाव्यात बोलताना गडाख म्हणाले, ‘करोनाच्या काळात मुख्यमंत्री यांनी थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची भंपकबाजी न करता मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी संयमीपणे पार पाडली.’ ( Praises CM ) कोपरगाव येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, सपना मोरे, सुहास वहाडणे, डॉ. अजय गर्जे, प्रमोद लबडे, बाळासाहेब जाधव, सुनिल तिवारी, वर्षा शिंगाडे, विक्रांत झावरे, मुकुंद सिनगर, प्रफुल्ल शिंगाडे यांच्यासह पदाधिकारी, महिला व शिवसैनिक उपस्थित होते. वाचा: यावेळी बोलताना गडाख यांनी मुख्यमंत्र्यांचे कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आणि करीत आहोत. हे सांगण्याची एक संधी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांना मिळाली आहे. अनेक वर्षांच्या युतीने विश्वासघात केल्यानंतर जाहीरपणे बोलता येईना आणि कुणाला सांगता येईना. तेव्हा नवीन प्रयोग करीत महाविकास आघाडीची स्थापना झाली. मुख्यमंत्री कोण ? यावर खल सुरू असताना पक्ष चालविणे वेगळे आणि सरकार चालविणे वेगळे असे खुलेपणाने सांगणारे केवळ उद्धव ठाकरे हेच होते. इच्छा नसतानाही ते मुख्यमंत्री झाले, ते केवळ तुमच्या आमच्यासाठीच. पैशाचा हिशोब न करता आर्थिक मेळ बसत नसतानाही शेतकऱ्यांना २४ हजार कोटींची कर्जमाफी खुलेपणाने दिली. काळात थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची भंपकबाजी केली नाही. थेट जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची सर्व तयारीही केली आहे.’ खासदार लोखंडे म्हणाले, ‘नवे, जुने, राग, लोभ, हेवेदावे बाजूला ठेवा,सर्वांनी एकत्रितपणे येऊन काम करावे. राज्य शासनाच्या योजनांचा सामान्यांना फायदा झाला आहे. ती कामे जनतेपर्यंत पोहचवा. राज्याच्या योजना घराघरात पोहचवा. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा,’ असे आवाहनही लोखंडे यांनी केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36xFGyP

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.